सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीत दि. ३१ रोजी उंडवडी सुपे ता.बारामती जि पुणे या गावात पाटस ते बारामती रोडलगत असणा-या शेतात उडीद पिकाचे युरपणी करत असताना तीन अज्ञात मुलांनी जाधवांचे शेत इथं कोठे आहे असे विचारण्याचा बहाना करून संबंधेत महीलेचे जवळ जावून त्याच हातातील विळा बळाबरीन घेवुन त्याचा धाक धाकधुन महिलेच्या गळ्यातील साधारण सोन्याचे २२ हजार किंमतीचे ४.७५ ग्रॅम वजनाचं मंगळसुत्र चोरी केली होती. त्या अनुषंगाने घडले प्रकार बाबत्त सौ.लक्ष्मी देवीदास गवळी वय ३६ वर्ष, उंडवडी सुपे ता.बारामती नि पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल
झालेला होता.
फिर्यादीनं अज्ञात आरोपीचं सांगितले याबाबत वडगाव निंबाळकर पोलिसांनी बारामती य दौड तालुक्यातील विविध मागावरील सी सी.टी.झी कॅमेरांची पडताळणी करून त्यात निष्पन्न झालेल्या संशयित आरोपी सी.सी.टी.व्ही फुटेज वरील फोटो तसेच रेखाचित्र सोशल मिडीया मधून प्रसारीत करण्यात आलेले होते. त्यावरून सौरभ तात्याबा सोनवलकर रा सस्तेवाडी, सागर दतात्रय जगताप रा.वाणेवाडी ता. बारामती व एक अल्पवयीन मुलगा रा.सस्तेवाडी ता.बारामती यांनी हा गुन्हा केलेली गोपनीय माहीती वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला मिळाली.
दि ५ रोजी हे संशयित आरोपी फरार होण्याच्या तयारीत असताना वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे तपासी अधिकारी सलीम शेख इतर पोलीस स्टाफ यांनी सदर आरोपींचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतलेले आहे.
सदरची कामगिरी अभीनव देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मिलिंद मोहिते अपर पोलीस
अधीक्षक बारामती विभाग, नारायण शिरगावकर उपनिभागीय पोलिस अधिकारी,बारामती उपविभाग, तसेच
शपदमाकर घनवट पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सोमनाथ लांडे, पोलीस उपनिरीक्षक सलीम घेख, .महेंद्र फणसे, पो.ना तासिक मनेरी, सागर चौधरी, पो.कॉ.ज्ञानेश्वर सानप, सलमान खान, अभय सिताप. पोपट नाळे, अमोल भुजबळ भाऊसाहेब मारकर, सचिन दरेकर, भागवत पाटील यांनी केलेली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख हे करीत आहेत.