बारामती तालुक्यातील निंबुतच्या सासरवासीनची माहेरात आत्महत्या : तिघांविरोधार गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------

निंबुत (ता. बारामती) येथील स्वाती जयजीत काकडे (वय ३१) या महिलेने माहेरी (नायगाव ता. पुरंदर) शुक्रवारी रात्री विहीरीत उडी टाकून आत्महत्या केली. याप्रकरणी पती जयजीत अरूण काकडे, सासू मीनाक्षी अरूण काकडे व सासरे अरूण भगवान काकडे यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा जेजुरी पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. 
                मयत महिलेचा भाऊ संतोष बाळासाहेब कड (वय २७) याने जेजुरी पोलिसांत फिर्य़ाद दिली आहे. 'तूझे वजन जास्त आहे. दररोज एकच चपाती खात जा असे म्हणून तिला उपाशी ठेवले. लग्नात माहेरकडून कुलर, वॉशिंग मशिन अशा मोठ्या वस्तू दिल्या नाहीत. तुझ्या वडीलांना विमानतळाचे किती पैसे मिळणार आहेत असे म्हणून स्वाती हिस पैशाची वारंवार मागणी केली. आम्ही काकडे देशमुख आहोत, आमच्या शेजारी तुमची बसायची लायकी नाही' असा विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला. शुक्रवारी महिला माहेरी असताना पतीने दिवसभर फोन करून 'मला तुझी गरज नाही. तू इकडे यायचे नाही. आत्ताच्या आत्ता घटस्फोट दे असे म्हणून त्रास दिला. रात्री नऊ वाजताही त्याने फोनवरून वाद घालत महिलेचा मानसिक छळ केला. त्याच रात्री तीने छळाला कंटाळून शेतातील विहीरीत उडी मारून आत्महत्या केली असे फिर्य़ादीत म्हटले आहे. तपास अधिकारी फौजदार एस. ई. सोनवलकर अधिक तपास करत आहेत
To Top