सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे नीरा बारामती रस्त्यावर वाऱ्याच्या वेगाने गाडी सुसाट निघाली होती. त्याच्या गाडीला जणू ब्रेकच नव्हता. त्याला घाई इतकी होती की. पुढं त्यांची गिऱ्हाईक लाईन लाऊन होती की काय? की सत्कार होणारा होता? त्याची गाडी आली आणि इतक्या जोरात धडक दिली की आख्य गाव गोळा झालं. मोठा आवाज होत फरफटत गाडी रस्त्यावरून वीस फुटावर जाऊन मंगच थांबली. गाडी नुसतीच थांबली नायतर रस्तावर मोठा यैवज पडला....हो यैवजच होता तो रस्त्यावर पोतभर दारूचं दारूचं पडली होती.
झालं असकी , वाघळवाडी गावातील निरा- बारामती रस्त्यावर श्रीकृष्ण मंदिराजवळ दोन दुचाकी चा कर्कश..आवाज करत अपघाताच्या ठिकाणी गाव गोळा झालं. निरेच्या दिशेने आलेल्या एका दारू व्यावसायिक यांनी वाघळवाडी येथील महेश सावंत यांना जोरदार धडक दिली. महेश सावंत हे जागेवरच बेशुद्ध अवस्थेत पडले. घरासमोरच अपघात झाल्याने आपल्या पतीला अश्या अवस्थेत पडल्याचे डोळ्यासमोर बघून हंबरडा फोडला. त्यांना गंभीर दुःखापत झाली. गाडीवर असलेल्या दारू व्यवसायिकाला यांना भरधाव वेग नडला आणि त्यात तो पण जखमी झाला आहे.
गाड्याच्या आवाजाने सगळं गाव अपघाताच्या ठिकाणी गोळा झालं. चारशे -पाचशे जण गोळा झाल्याने जमावाने दारू वाल्यांची नशाच उतवरली. जमावाने धु-धु धुतल्याने दारू विक्री नको असं म्हणायला पण त्याला ताकत राहिली नव्हती. दारू बंद करा नाही तर आम्हला बंद करायला लावु नका. म्हणत गावकरी एकवटले आणि अपघात ठिकाणी आलेल्या पोलिसांना काय कारवाई करणार हे विचारू लागले.
कमी कष्टात चिक्कार पैसा कमवता या हेतूने अनेक वर्षांपासून दारू विकण्याचा व्यवसाय कन्नडवस्ती येथे लोकांच्या समोर खुलेआम चालतो. आणि त्यास सगळे डोळेझाक करतात. कन्नडवस्ती वस्ती मध्ये मोलमजुरी अनके कुटुंब रहातात. रस्तावर आणि वस्तीत दारु विक्री होत असल्याने वस्तीतील नागरिक पार वैतागून गेलेत. अनेक वेळा कारवाई होत. बातम्या येतात पण दारू वाल्यांचा उतमात इतका झाला की रस्तावरच दारूचा बाजर मांडलाय.
आमचं कोणी काही करू शकत नाही. म्हणत खुलेआम होत असलेल्या दारू विक्री करणा-यांना धाक नाही का? राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांच्या मतदार संघात अशी दारू विक्री करणा-यांना लगाम बसणार का? की असे अपघात आणि अशी विषारी दारू विक्री करून लोकांच्या जीवाशी खेळ चालू राहणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.