उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानंतर श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर सोमेश्वर देवस्थान रस्त्याची डागडुजी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------

बारामती तालुक्यातील करंजेपुल ते सोमेश्वर मंदिर येथे जाणाऱ्या रस्त्याची मागील अनेक दिवसांपासून दुरावस्था झाली होती. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून त्यामुळे पावसाचे  पाणी साचल्यामुळे वाहने चालवताना  कसरत करावी लागत होती परिणामी अपघात होण्याची शक्यता वाढली होती.
          परिसरातील नागरिकांकडून व वाहतूकदारांकडून हा रस्ता दुरुस्त व्हावा, याबाबत वेळोवेळी मत मांडले होते. सोमेश्वर मंदिर रस्त्याच्या झालेली दुरावस्था व त्याबाबतची नागरिकांची नाराजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवा नेते ऋषी गायकवाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्यापर्यंत पोहोचवली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी याबाबतचे आदेश बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.संबंधित अधिकाऱ्यांनी रस्ता दुरुस्तीचे काम तत्परतेने हाती घेतले आहे यामुळे परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. श्रावण महिना सुरू होतानाच या रस्त्याचे दुरुस्तीचे काम बांधकाम विभागामार्फत केले जात असल्यामुळे परिसरातील भाविकांनी बांधकाम विभागाचे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार व्यक्त केले.
To Top