सोमेश्वर रिपोर्टर टीम------
खेड तालुक्याच्या राजगुरुनगर येथील केटीईएस.इंग्लीश मेडियम स्कूलच्या झूम ऑनलाईन क्लास चालू असताना
अश्लील व्हिडिओ प्रसारित झाल्याने खळबळ उडाली.
या.प्रकारामुळे विद्यार्थी आणि विद्यार्थीनिंना धक्का पोहचला असून पालकांमध्ये तीव्र नाराजी उमटली आहे.
या घटनेबाबत मुख्यध्यापिका ज्योती ठाकूर यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शाळेच्या एक शिक्षिका ३० जुलैला साडेबारा वाजता 'झूम' अॅपच्या लिंकद्वारे दहावीच्या विद्यार्थ्यांशी कनेक्ट होऊन शिकवू लागताच, लेक्चरबरोबर अश्लील व्हिडिओ चालू झाला. त्यामुळे.या लिंकद्वारे शिकण्यासाठी कनेक्ट झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना धक्का बसला. त्यातील अनेकांनी लगेच.पालकांच्या निदर्शनास ही गोष्ट आणली संबंधित घटनेची आम्ही.माहिती घेतली असून रितसर कायदेशीर तक्रार करणार आहोत..कुणीतरी सायबर गुन्हेगाराने हॅकिंगद्वारे त्या लिंकमध्ये गुन्हा केला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस यंत्रणा त्याचा छडा लावेल, असे शाळेच्या वतीने सांगण्यात आले.