सोमेश्वरनगर वाघळवाडी हद्दीमध्ये शेकडो हेक्टर क्षेत्रावर वनक्षेत्र परिसर असून पावसामुळे हा सध्या हिरवाईने नटला आहे. मात्र या वनविभागाला तळीरामांनी दारू आणि मटणाचा अड्डा बनवला आहे.
या वनक्षेत्रांमध्ये ससा ,हरीण ,तरस विविध प्रकारचे पक्षी विविध जातीची झाडे या वनपरिक्षेत्रात वृक्षारोपण करून संवर्धन करण्यात आले आहे. मात्र ही वनसंपदा आता धोक्यात आली असून इथे तळीरामांचा अड्डा तयार झाला आहे राजरोसपणे दिवसाढवळ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या करंजेपुल दूरक्षेत्राच्या शेजारी तळीराम इथे आपले दिवसभर ठाण मांडून बसलेले असतात. त्याचबरोबर या क्षेत्रामध्ये विविध ग्रुपकडून आखाड पाट्या रंगवल्या जातात वनक्षेत्रात चुली पेटवून तेथील संपत्तीची नासधूस केली जात आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावरती काचेच्या बाटल्या व प्लास्टिकचा कचरा या क्षेत्रामध्ये वाढू लागला आहे वनविभागाकडून या क्षेत्राच्या मुख्य रस्त्यावर गेट लावण्यात आले होते पण या गेटचे योग्यप्रकारे काळजी घेतली जात नसून याचे लॉक तोडून गेट उघडे करण्यात आले असल्याने या तळीरामांचे फावत असल्याचे चित्र दिसत असून निसर्गप्रेमी ही संपदा वाचवण्यासाठी व निसर्गाची नासधूस करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी यासाठी आग्रही आहे.
COMMENTS