सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मुरूम गावचे हद्दीत 'गाईच्या व्यवहारातील पैसे देण्याचे कारणावरून' तलवारीने गंभीर मारहाण करून खुनाचा प्रयत्न केला होता, सदरबाबत वडगाव निंबाळकर पोस्टे गु. र. नं. 520/2020 भादवि 307,143, 147, 326 प्रमाणे दि. 15/11/2020 रोजी गुन्हा दाखल होता,सदर गुन्ह्यातील 9 आरोपी या अगोदर अटक केले होते व एक आरोपी शंकर तात्याबा बोडरे रा. पिंपळवाडी साखरवाडी ता. फलटण जि. सातारा हा गुन्हा घडल्यापासून फरार होता तो साखरवाडी ता फलटण येथे येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन अटक केली आहे.
सदर ची कारवाई ही डॉ अभिनव देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मा. अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते बारामती विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सोमनाथ लांडे, पोसई, योगेश शेलार, पोसई कवितके, पो ना चौधरी, पोना खेडकर, पोना गोपाळ, पो.शि. साळुंखे, पो शि लोखंडे यांनी ही कामगीरी केली आहे.