सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथील वैष्णवी अविनाश सावंत यांची बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती सरचिटणीस निवड करण्यात आली आहे.
बारामती येथे राष्ट्रवादी भवन येथे पार पडलेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्या हस्ते वैष्णवी सावंत यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी धनवान वधक, भाग्यश्री धायगुडे आदी मान्यवर उपस्थित होते. भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे वैष्णवी सावंत यांनी सांगितले.