पुरंदर l शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरावे लागेल - सुदाम इंगळे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
जेजुरी : प्रतिनिधी

 केंद्रशासनाच्या शेतकरी धोरणाविरुद्ध आता रस्त्यावर उतरावे लागेल असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते सुदाम इंगळे यांनी नाझरे क.प. येथील विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी केले. 
          नाझरे क.प. ग्रामपंचायतीच्या वतीने कऱ्हा नदीवरील दोन गावांना जोडणारा सुमारे ३१  लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या साकव पुलाचा लोकार्पण सोहळा, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष संदीप चिकणे यांच्या वतीने शालेय विध्यार्थ्यांना सायकल वाटप आणि कोरोना काळात काम करणाऱ्या स्थानिक कोरोना योद्यांचा गौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते सुदाम इंगळे होते. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य दत्ताशेठ झुरंगे, जिल्हा बँकेचे संचालक डॉ.दिगंबर दुर्गाडे, काँग्रेसचे नेते नंदुकाका जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष माणिक झेंडे, पंचायत समिती सदस्या सोनाली यादव, सुनीता कोलते यांच्या हस्ते पुलाचा लोकार्पण सोहळा व विविध विकास कामांबरोबर कोरोना योद्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी श्री इंगळे बोलत होते. ते म्हणाले, नाझरे क.प. येथे खा. सुप्रिया सुळे आणि आमदर संजय जगताप यांच्या माध्यमातून सुमारे सहा कोटींची विकासकामे सुरू आहेत. गावाची एकी असेल तरच विकास कामे होत असतात. नाझरे क.प. ग्रामस्थांनी एकीतून हे दाखवून दिले आहे. अशीच एकी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दाखवली तर गावांचा विकास वेगाने होऊ शकेल. एकीकडे विकास कामे राज्यशासनाकडून होत असताना दुसरीकडे केंद्रशासन ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. आज गेल्या वर्षभरापासून दिल्लीच्या तीन ही सीमेवर शेतकरी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करीत आहे. त्यांच्याकडे केंद्रशासन लक्ष देत नाही. दुसरीकडे पेट्रोल डिझेलच्या मिळणाऱ्या करातून देश चालवला जात आहे. इंधनाने आज शंभरी पार केली आहे. यामुळे महागाईचे चटके सर्वसामान्यांना सोसावा लागत आहे. शेतकरी व सर्वसामान्यांचे प्रश्न केंद्रात सत्तेत बसलेल्या बनियाला दिसत नाहीत. उलट देश विकण्याचा धंदा जोमात सुरू आहे. शेतकरी सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. असे ही त्यांनी यावेळी सांगितले. 
             यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष संदीप चिकणे यांनी अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून  गरजू विद्यार्थाना पाच सायकलींचे वाटप केले त्याची दखल घेत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थाना सायकल वाटप करण्याचा प्रयत्न करू असे जि प सदस्य दत्ताशेठ झुरंगे यांनी म्हटले आहे. तर कोरोना काळात स्थानिक पातळीवरून आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी पत्रकार आदी  ३० जणांना कोविड योद्धा म्हणून गौरवण्यात आले. कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सर्वसामान्यांसाठी रात्रंदिवस राबणाऱ्यांचा यथोचित सत्कार केला गेला. अशावेळी आपण ही तेवढ्याच जबाबदारीने त्यांना सहकार्य केले पाहिजे
 कोरोना अजून संपलेला नाही, तिसऱ्या लाटेची शक्यता असून नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करावे असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक डॉ.दिगंबर दुर्गाडे यांनी केली. 
यावेळी नंदुकाका जगताप, माणिक  झेंडे, देविदास नाझीरकर यांचे ही भाषणे झाली.  कार्यक्रमाला उपसरपंच   नामदेव चिकणे, नाझरे सुपे चे सरपंच भाऊसाहेब कापरे, संभाजी काळाने, उत्तम शिंदे, महेंद्र खैरे माऊली यादव आदींसह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. 
स्वागत संदीप चिकणे यांनी केले, प्रास्ताविक सरपंच मनीषा नाझीरकर यांनी केले सूत्रसंचालन मोहन नाझीरकर यांनी केले.
----------------------------
 या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष संदीप चिकणे यांनी अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून  स्वखर्चातून शालेय विद्यार्थाना सायकल वाटप केले. या स्तुत्य उपक्रमाची सर्वच वक्त्यांनी स्तुती केली असून हा उपक्रम जिल्हा परिषदेने पुन्हा सुरू केला पाहिजे अशी मागणी केली
To Top