सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
राज्यातील सोमेश्वर कारखान्यासह पुढील आठवड्यापासून निवडणुका घेण्याच्या तयारीत असल्याचे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी 'सोमेश्वर रिपोर्टर' बोलताना माहिती दिली. तत्पूर्वी सोमेश्वर रिपोर्टर च्या प्रतिनिधीनी महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे खाजगी सचिव संतोष पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही दि ३१ ऑगस्ट पर्यंत निवडणूक स्थगित करण्यात आली होती. त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हा १० सप्टेंबर पर्यंत घेण्याचा होता मात्र राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत कोणताही निर्णय न झाल्याने राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण राज्यातील निवडणुका घेण्यास सक्षम असल्याचे सांगत राज्यातील सर्वच साखर कारखान्याच्या निवडणुका होण्यास दुजोरा दिला आहे.