बारामतीच्या पश्चिम भागातील दोन भोंदू बाबांनी घेतला धसका : मनोहर मामाच्या अटकेने भोंदू बाबांचे धाबे दाणाणले

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम---------

भोंदु मामाला बारामतीच्या पोलिसांनी तातकाळ ताब्यात घेतल्यानंतर आता कोणाची बारी असे मेसेज सोशल मिडिया वरुन फिरत आहेत. त्यामुळे आज उद्या बारामती तालुक्याच्या पश्चिमेकडील दोन गावातील भोंदु बाबा महाराजांवर कारवाई होणार का ? का तक्रादर तक्रार देण्याची वाट बघावी लागे. मात्र आजच्या कारवाईने या दोघा भोंदुबाबांनी धस्का घेतला आहे हे मात्र नक्की.
            आज शुक्रवारी भुंदुबाबा मनोहर उर्फ मामा भोसले याच्या बारामतीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांचे कौतूक नागरीकांकडून होत आहे. आता बारामतीच्या आणखी दोघा भोंदूबाबांच्या मुसक्या कधी आवळत्यात याकडे लोकांचे लक्ष लागुण राहिले आहे. बारामतीच्या निंबुत व वाकी - चोपडज या गावत असे भोंदुबाबा लोकांना फसवत असल्याची जोरदार चर्चा आहे. या दोघांना राजकीय व उद्योजकांचा वरदहस्त असल्याचे बोलले जाते. भोळ्या भाबड्या लोकांना हे आपल्या जाळ्यात अडवकतात. थेट मागणी करत नसले तरी हस्ते पर हस्ते रक्कम किंवा दान रुपात महागड्या वस्तु स्विकारल्य जातात. देवीला दागिने पाहिजेत, देवीला हार, आंगठी, नथ, पैंजण अशा वस्तु लागतात असे थेट सांगीतले जात नसले तरी फिरवून बोलत लकांना ते कसे कळेल अशा भाषेत सांगितले जाते. 
           पिडीत लोक रुग्णालयात चकरा मारुन कंटाळलेले असतात. अमाप पैसा खर्च झालेला असतो. मंग अंधश्रद्धा असली तरी मनाची समजूत काढायची म्हणून असा मार्ग ते स्विकारतात. मंग आधी मोफत सल्ले मिळता म्हणून ते येणे जाणे (आमवशा - पोर्णिमा) सुरु करतात. पुढच्या वेळी मोकळ्या हताने कसं जायचं म्हणून लोक काहीतरी फुल न फुलाची पाकळी घेऊन जातात. पुढे महाराजांच्या अपेक्षा पुर्ण केल्या जातात. 
           आता बारामतीच्या पश्चिमेकडील या दोघा बाबांकडून कोणी पिडीत असेल तर त्यांनी पुढे येऊन पोलीसांत तक्रार द्यावी अशी मागणी होऊ लागली आहे. लोकांनी न भिता अशा बाबांचे प्रस्थ वाढू देऊ नये. अन्यथा काही गंभिर घडल्यास मोठी हाणी होऊ शकते.
 
To Top