सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक या ठिकाणी एका विवाहितेने घरासमोरील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. रेश्मा राहुल पवार (वय 23 वर्ष) असे मयत विवाहितेचे नाव असून मयत विवाहितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून वडगाव निंबाळकर पोलिसांनी अमित राजेंद्र पवार व संगीता राजेंद्र पवार (दोघे राहणार कोऱ्हाळे बुद्रुक) या दोघांविरोधात विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख करीत आहेत.