बारामती ! वढाणेतील विकास कामासाठी निधी उपलब्ध करु : विश्वास देवकाते

Admin
दीपक जाधव
सुपे : प्रतिनिधी 

बारामती तालुक्यातील वढाणे गावच्या विविध विकास कामासाठी लागणारा निधी यापुढेही उपलब्ध करु असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी केले. 
         वढाणे येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस युवक शाखेच्या फलकाचे उद्घाटन देवकाते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी ग्रामस्थांच्यावतीने मान्यवरांचा पुणेरी पगडी देवुन सत्कार करण्यात आला. 
       देवकाते म्हणाले की वढाणे येथे मागिल काही वर्षात सुमारे ६ कोटींची विकास कामे झाली आहेत. तर यापुढेही येथील विकास कामात कोणताच खंड पडु नये यासाठी निधी उपलब्ध केला जाईल. 
    माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून येथील विकास कामे सुरु आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच जनाईचे आलेल्या पाण्याचे येथील तलावात जलपुजन केले. त्यामुळे येथील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याचे देवकाते यांनी सांगितले. 
      याप्रसंगी सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, राहुल वाबळे, गणेश चांदगुडे, पोपटराव पानसरे, संपतराव जगताप, शौकत कोतवाल, विठ्ठल खैरे, रत्नप्रभा चौधरी, हरिभाऊ भोंडवे, राजेंद्र भोंडवे, कालिदास भोंडवे आदी उपस्थित होते. यावेळी येथील राष्ट्रवादी युवक शाखेच्या अध्यक्षपदी सचिन चौधरी, उपाध्यक्ष राजेंद्र शिंदे, तर सचिवपदी सागर कौले आदींसह कमेटी स्थापन करण्यात आली. 
    याप्रसंगी माजी सरपंच बी. आर. चौधरी, मच्छिंद्र चौधरी, रामभाऊ लकडे, बाळासो भोंडवे, सुनील चौधरी, चंदन चौधरी, अँड. ज्ञानदेव चौधरी, देवराम चौधरी, मोहन चौधरी, भानुदास चौधरी, यशवंत चौधरी, अर्जुन चौधरी, प्रकाश चौधरी, शिवाजी कौले, बाबाजी शिंदे, शंकर लकडे, संतोष गोरे आदी उपस्थित होते. 
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक काशिनाथ चौधरी यांनी केले. तर आभार प्रगती चौधरी यांनी मानले. 
    ...............................................
To Top