सारीका तांबे-शिर्के यांना राज्यस्तरीय गुरुगौरव शिक्षक पुरस्कार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
कल्याणी भोसले- जगताप
 
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेने राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त राज्यस्तरीय शिक्षक सन्मान गुरुगौरव पुरस्काराने तसेच यावर्षीच्या जागतिक महिला दिनानिमित्त दिला जाणारा "आत्मनिर्भर स्त्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय मुर्टी (ता.बारामती) येथे कार्यरत असणाऱ्या आदरणीय सहशिक्षिका, विद्यालयामध्ये सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख सारिका नवनाथ तांबे-शिर्के यांच्या याच कार्याची दखल घेत राष्ट्रीय राज्यस्तरीय शिक्षक सन्मान गुरुगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
           गुणवत्तापूर्ण शिक्षण फक्त शहरातच मिळते, हा समज मोडीत काढत आपण विविध उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलांच्या अंगीभूत असलेल्या कलागुणांना वाव देत शाळेचा दर्जा उंचावन्याकरिता करत असलेला प्रयत्न असो वा खेड्यातील मुलांना शिक्षणाचे अवकाश खुले करण्याकरीताचा प्रयत्न असो वा स्पर्धेच्या जगात नवनवीन क्षेत्रांची कवाडे त्यांच्यासाठी खुली करण्याचा प्रयत्न असो वा त्यांच्यातील कलागुण हेरत त्यांच्या जीवनाला दिशा देण्याचे कार्य करण्याचा प्रयत्न असो.
माझ्या भागातील मुलं पुढे गेली पाहिजेत म्हणून शाळेचा वेळ संपल्यानंतर सुद्धा आपला वैयक्तिक वेळ विद्यार्थ्यांना देऊन मोलाचे मार्गदर्शन करणे असो, विशेष म्हणजे जे विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणाच्या प्रवाहापासून लांब राहू शकतात अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठीची तळमळ म्हणून समाजातील वेगवेगळ्या माध्यमातून स्वतः प्रयत्न करून विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळवून देऊन शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यात मोलाचा वाटा असो.
त्याचप्रमाणे लॉकडाउनमध्येही तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करुन विद्यार्थ्यांना शिकवले. त्याचप्रमाणे लॉकडाउनमध्येही तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करुन विद्यार्थ्यांना शिकवले.
त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्याची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.     पुरस्कार मिळाल्या बद्दल त्याचे कौतुक केले जात आहे.
To Top