बारामती तालुका महिला दक्षता कमिटीचे काम महत्वपूर्ण : पोउनि योगेश शेलार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------

तालुक्यातील महिला दक्षता कमिटीचे काम महत्वपूर्ण असून ही कमिटी पोलीस यंत्रणेला वेळोवेळी मदत करत असते. त्याच बरोबर पत्रकार संघटना व आजी माजी सैनिक संघटनेचे देखील काम कौस्तुकापद असल्याचे प्रतिपादन वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार यांनी केले. 
          सोमेश्वरनगर येथे करंजेपुल पोलीस ठाण्यात आयोजित केलेल्या रक्षाबंधन कार्यक्रमात ते बोलत होते. महिला दक्षता कमिटीच्या अध्यक्षा सुचिता साळवे व सदस्या नुसरत इनामदार यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते. यावेळी जेष्ठ पत्रकार जयराम सुपेकर, adv. गणेश आळंदीकर, संतोष शेंडकर, महेश जगताप, तुषार धुमाळ, सैनिक संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर, राजाराम शेंडकर, बाळासाहेब गायकवाड, चंद्रकांत सोनवणे, ज्ञानदेव कुंभार, प्रशांत शेंडकर, नितीन शेंडकर, रामदास कारंडे, विजय शेंडकर, दत्तात्रय चोरगे, सुखदेव शिंदे व बुवासो हुंबरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम जयराम सुपेकर व बाळासाहेब शेंडकर यांनी मनोगते व्यक्त केली.
To Top