इतरांसाठी जगणारे विचार सोमेश्वरनगर मध्ये पाहायला मिळतात : जेष्ठ पत्रकार जयराम सुपेकर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर न्युज-------

राखी पौर्णिमा हा असा सण आहे की त्यादिवशी एखादी संकल्पना करून ती आचरणात आणण्याची गरज आहे. त्याचबरोबर याभागातील पोलीस, पत्रकार व आजी माजी सैनिकांचे काम कौस्तुकास्पद असून दुसऱ्यासाठी जगणारे विचार या भागात सापडतात असे मत जेष्ठ पत्रकार व प्राजक्ता मतिमंद निवासी विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष जयराम सुपेकर यांनी व्यक्त केले. 
            सोमेश्वरनगर येथे करंजेपुल पोलीस ठाण्यात आयोजित केलेल्या रक्षाबंधन कार्यक्रमात ते बोलत होते. महिला पोलीस दक्षता कमिटीच्या अध्यक्षा सुचिता साळवे व सदस्या नुसरत इनामदार यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार, पत्रकार adv. गणेश आळंदीकर, संतोष शेंडकर, महेश जगताप, तुषार धुमाळ, सैनिक संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर, राजाराम शेंडकर, बाळासाहेब गायकवाड, चंद्रकांत सोनवणे, ज्ञानदेव कुंभार, प्रशांत शेंडकर, नितीन शेंडकर, रामदास कारंडे, विजय शेंडकर, दत्तात्रय चोरगे, सुखदेव शिंदे व बुवासो हुंबरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम पोलिस उपनिरीक्षक योगेश शेलार व बाळासाहेब शेंडकर यांनी मनोगते व्यक्त केली.
To Top