मु सा काकडे महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------

शिक्षक दिनाचे औचित्य साधून सुचिता साळवे सार्वजनिक वितरण व्यवस्थापण समिती सदस्य तसेच काकडे महाविद्यालय महिला सबलीकरण कमिटी सदस्य यांनी काकडे महाविद्यालयातील प्राध्यापक यांचा पुष्प देऊन सन्मान केला. 
         या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जगन्नाथ साळवे,प्रा.डॉ. बाळासाहेब मरगजे, प्रा. डॉ. संजू जाधव रजनीकांत गायकवाड.प्रा.जाधव पी.टी. ,प्रा.गोरखनाथ काळे,प्रा.संतोष शेळके, प्रा.चेतना तावरे,प्रा,दळवी, प्रा. रामभाऊ हाके.आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. संजू जाधव यांनी केले. सुचिता साळवे यांनी शिक्षकांबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. राष्ट्रउभारणीत व पिढी घडवण्यात शिक्षकांचे मोलाचे कार्य असल्याचे त्यांनी सांगितले.या कार्यक्रमाचे आभार प्रा.डॉ बाळासाहेब मरगजे यांनी केले.
To Top