मोठी बातमी : राज्यात शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----

 राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. गेल्या वर्षी कोरोना  महामारीमुळे मार्च महिन्यात बंद झालेल्या राज्यातल्या शाळा  येत्या चार आॅक्टोबरपासून पुन्हा सुरु होत आहेत. 
शिक्षण विभागाने राज्यातल्या शाळा सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे  प्रस्ताव पाठवला होता. गेले काही महिने राज्यातल्या शाळा सुरु करण्याबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरु होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी शाळा सुरु करायला परवानगी दिली नव्हती. राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचे बोलले जाऊ लागल्यावर पुन्हा एकदा शाळा सुरु करण्याचा प्रस्ताव लांबणीवर पडला होता. मात्र, आता मुख्यमंत्र्यांनी हा प्रस्ताव मान्य केला आहे. त्यानुसार कोरोनाचे सर्व नियम पाळून राज्यातल्या शाळा पुन्हा सुरु केल्या जाणार आहेत. राज्यात शाळा बंद झाल्यानंतर गेले संपूर्ण वर्ष आणि त्यानंतर नव्या शैक्षणिक वर्षात आतापर्यंत आॅनलाईन शिक्षण सुरु होते. 
To Top