सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या मोटारसायकल अपघातात दोघेजण ठार झाल्याची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
लोणंद शिरवळ रस्त्यावर अंदोरी गावाच्या हद्दीत असलेल्या खिंडीत रात्री आठ वाजताच्या सुमारास मोटारसायकल खड्ड्यात आपटून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले मोटारसायकलस्वार शिवाजी रघुनाथ उफाळे वय 45 वर्ष रा . रा.हातमुशी ता भोर जि पुणे हे डोक्याला मार लागुन अतिरक्तस्त्राव झाल्याने मयत झाले. त्यांचे लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. याबाबतची खबर त्यांचा मुलगा ओंकार ऊफाळे याने लोणंद पोलीस ठाण्यात दिली असुन पुढील तपास सपोनि विशाल वायकर यांच्या मार्गदर्शनानुसार पोहवा. पवार करीत आहेत.
दुसऱ्या एका घटनेत आज दि ०३ रोजी लोणंद निरा रोडवर बाळु पाटलाची वाडी फाट्याजवळ सकाळी साडेअकराच्या सुमारास दुचाकीवरून जात असताना गळ्यातील तोंडाला बांधायचा स्कार्फ मोटर सायकलच्या मागील चाकात अडकल्याने झालेल्या अपघातात गळ्यास व डोक्यास गंभीर दुखापत होऊन सत्वशिला रामदास घोलप वय ५५ रा. खडकी बाजार, पुणे यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अलंकार संजय शेलार रा. बिरोबावस्ती लोणंद याने लोणंद पोलीस ठाण्यात अपघाताची खबर दिली असुन लोणंद पोलीस तपास करीत आहेत.