भोर l राजगड पोलिस ठाण्याच्या निरीक्षकपदी सचिन पाटील

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------

भोर तालुक्यातील राजगड पोलिस ठाण्याच्या निरीक्षकपदी सचिन पाटील यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे. पो. नि.संदीप घोरपडे यांची बदली झाल्यामुळे रिक्त जागी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाटील यांनी नक्षलग्रस्त गडचिरोली भागातील गोंदिया येथे विशेष अभियान पथकात उत्कृष्ट काम करून पोलिस महासंचालक पदक मिळवले आहे. त्यांनी पुणे शहर, बारामती, वालचंदनगर, वडगाव निंबाळकर येथील पोलिस ठाण्यामध्ये सहायक पोलिस निरीक्षक म्हणून काम केलेले आहे. त्यानंतर पदोन्नती होऊन कोल्हापूर येथे पोलिस निरीक्षक म्हणून काम केले असून, अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल त्यांनी केली आहे. 
To Top