विधान परिषदेच्या यादीतून राजू शेट्टी यांचे नाव वगळले

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------

शेतकरी संघटनेचे नेते माजी खा. राजू शेट्टी यांचा विधान परिषदेच्या यादीतून पत्ता कट झाला आहे. त्याऐवजी नवे नाव नमूद करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या स्वाक्षरीचे निवेदन राज्यपालांना प्रत्यक्ष भेटीत दिले गेले आहे. या बारा नावांच्या यादीवर सकारात्मक निर्णय घेतो, असे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आश्वस्त केल्याचे वृत्त आहे.
        सरकारने राज्यपालांकडे विधान परिषदेच्या १२ रिक्त जागांसाठीची यादी पाठवली होती. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. शेट्टी यांचे नाव त्या यादीत देण्याआधी त्यांनी बारामती येथे जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची भेट घेतली होती. दोघांमध्ये दोन ते तीन तास चर्चा झाली. त्यानंतर शेट्टी यांचे नाव त्या यादीत समाविष्ट झाले होते.
To Top