सोमेश्वर रिपोर्टर टीम------
राज्याच्या सत्तेची सुत्रे बारामतीत असताना बारामती तालुक्यातील आणी सिमेवरील रस्त्याची अतिशय दुर्दैवी अवस्था झाली आहे.
राष्ट्रवादी पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यानी कोट्यावधीचा निधी बारामती मधे विकासकामासाठी आणला मात्र रस्त्याची दुरावस्था मात्र दयनीय आहे.
नगर सातारा महामार्ग शिरुर पासून सुरु होतो तो न्हावरा फाटा मार्गे केडगाव - सुपे - मोरगाव - निरा मार्गे सातारा जातो मात्र या मार्गाची कायम दुरावस्था असते सुपे ते चौफुला रस्ता पण संपूर्ण चांगला नाही. मोरगाव ते नीरा रस्ता तर नक्की 'खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे' असा प्रश्न निर्माण करतो . कंत्राटदाराना ब्लॅक लिस्ट मधे टाकले जायचे पण आता तसे चित्र दिसत नाही तात्पुरती डागडुजी केली जाते . अष्टविनायकातील प्रथम स्थान म्हणुन राज्यातुन भावीक येत असतात मोरगाव ला त्याचप्रमाणे सोमेश्वर ला देखील राज्यभरातुन दरवर्षी लोक येतात मात्र ग्रामीण भागातील या रस्त्याना चांगले दिवस कधी यायचे असा प्रश्न कायम असतो .
राष्ट्रवादी चे पदाधिकारी फक्त बारामती शहरातच कार्य करतात का ग्रामीण मधे हा प्रश्न वाटु लागला आहे. कारखान्याना ऊस वाहतुकीपासुन शैक्षणिक संकुलापर्यंत हे ग्रामीण रस्ते अत्यंत महत्वाची भुमिका बजावत असताना राष्ट्रवादी चे पदाधिकारी या रस्त्यासाठी का प्रयत्न करीत नाहीत हा मोठा प्रश्न आहे.
आता याबाबत स्वत: अजितदादाना सोमेश्वर मोरगाव रस्त्याने एकदा प्रवास घडवुन आणण्याची गरज आहे असे लोक चर्चा करीत आहेत प्रत्येकच बाब अजितदादा पर्यंत पोहोचु न देता पदाधिकारी वर्गाने हे रस्ते करुन घ्यावेत अशी मागणी नागरीक करीत आहेत.