'या' सहकारी साखर कारखान्याला सहा कोटींचा गंडा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----  

नांदेड जिल्ह्यात पालकमंत्री अधिपत्याखाली असलेल्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याला चेन्नई येथील कंपनीने पाच कोटी ९३ लाख ६५ हजार रुपयांचा चुना लावला आहे. 
              या प्रकरणी बारड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. भाऊराव चव्हाण साखर कारखान्याच्या साखर विक्रीचे टेंडर चेन्नई येथील एका कंपनीला दिले होते. साखर निर्यात केल्यानंतर कारखान्याला प्रतिटन आर्थिक मदत मिळते. परंतु, संबंधित
 कंपनीने निर्यात केलेली कुठलीही कागदपत्रे न सादर करता इंडोनेशिया या देशाने तुमची साखर नाकारल्याचा ई मेल पाठविला. या व्यवहारात कारखान्याची पाच कोटी ९३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी बारड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आले. बारड पोलिसांनी या प्रकरणात चेन्नईतील प्रदीपराज चंद्राबाबू, अहमदनगरच्या रुही येथील अभिजित देशमुख आणि इंडिगा मणी कांता यांना अटक केली आहे.
To Top