बारामती ! श्रीपाल ज्वेलर्समधील चोरीचा डाव फसला ! चोरटे सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद : सोन्याची तिजोरी फोडतानाचा पहा व्हिडिओ

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------

बारामती तालुक्यातील करंजेपुल येथील गायकवाड संकुल मधील संग्राम शहाणे यांच्या मालकीचे श्रीपाद ज्वेलर्स हे सोन्याचांदीचे दुकान आज मद्यरात्री चोरट्याने फोडले मात्र पेपर विक्रेते दादा कामठे यांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांना पलायन करावे लागले. 

           सविस्तर हकीकत अशी करंजेपुल येथे असणारे श्रीपाद ज्वेलर्स ची पाठीमागील भिंत फोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. कटरच्या साह्याने तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना तिजोरी फोडता आली नाही. करंजेपुल येथील पेपर विक्रेते दादा कामठे यांना संशय आल्याने चौकातील गणपती विक्रेत्यांना बरोबर घेऊन ते शहाणे ज्वेलर्स जवळ गेले असता चोरट्यांनी पलायन केले. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सपोनि सोमनाथ लांडे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. 
-----------------------
पोलिसांचा तपास सुरू-------
श्रीपाल ज्वेलर्स ची मागील भिंत फोडून चोरट्यानी आत प्रवेश केला. गोंधळ झाल्या नंतर चोरट्यानी त्याच ठिकाणी गॅस, गॅसकटर इतर साहित्य त्याच ठिकाणी टाकून पळाले आहेत. पोलिसांनी आता आसपास चे सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यास सुरुवात केली असून चोरटे लवकरच पोलिसांच्या ताब्यात असतील असे सोमनाथ लांडे यांनी सांगितले.
To Top