बारामती ! करंजेपुल येथील श्रीपाद ज्वेलर्स दुकान फोडले : पेपरविक्रत्याच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचे पलायन

Admin
2 minute read
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती तालुक्यातील करंजेपुल येथील गायकवाड संकुल मधील संग्राम शहाणे यांच्या मालकीचे श्रीपाद ज्वेलर्स हे सोन्याचांदीचे दुकान आज मद्यरात्री चोरट्याने फोडले मात्र पेपर विक्रेते दादा कामठे यांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांना पलायन करावे लागले. 
           सविस्तर हकीकत अशी करंजेपुल येथे असणारे श्रीपाद ज्वेलर्स ची पाठीमागील भिंत फोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. कटरच्या साह्याने तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना तिजोरी फोडता आली नाही. करंजेपुल येथील पेपर विक्रेते दादा कामठे यांना संशय आल्याने चौकातील गणपती विक्रेत्यांना बरोबर घेऊन ते शहाणे ज्वेलर्स जवळ गेले असता चोरट्यांनी पलायन केले.
To Top