राज्यातील सर्वांच्या आरोग्याची काळजी करणारा आरोग्यदूत येतोय नीरा-सोमेश्वरला

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------

 राज्यातील सर्व कुटुंबाना सरकारने मोफत आरोग्य विमा द्यावा व आरोग्यदान वेबसाईटच्या माध्यमातून निराधार लोकांना आरोग्य सेवा पोचवता यावी यासाठी राज्यभर पायी प्रवास करणारे घनश्याम केळकर  "महाराष्ट्र जनारोग्य महापरिक्रमा" करत   दि. ११ सप्टेंबरला नीरा तर 12 सप्टेंबरला सोमेश्वर येथे  पोचणार आहेत.
         मागील वर्षी दि. १७ आॅक्टोबर रोजी रायगड किल्ल्यावरुन चालत निघालेले घनश्याम केळकर  ३२१ व्या दिवशी रायगड, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया,भंडारा, नागपूर,वर्धा, अमरावती,अकोला, बुलढाणा, जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, पुणे या जिल्ह्यातून ३७०० किमीपेक्षा  जास्त पायी प्रवास करत वीर मार्गे नीरा येथे पोचणार आहेत. 

घरातील आजारपणामुळे ज्या कुटुंबांवर मोठे आर्थिक, मानसिक संकट कोसळते. याच काळात त्यांना मदतीचा हात देण्याची व्यवस्था प्रत्येक गाव, तालुका, जिल्ह्यात उभी करणे हा या परिक्रमेचा उद्देश आहे. यासाठी www.aarogyadaan.org या वेबसाईटच्या माध्यमातून यंत्रणा उभी करण्यात आली आहे. याचबरोबर राज्यातील सर्व कुटुंबांना आरोग्यविमा सरकारमार्फत दिला जावा यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.
नीरा येथे आरोग्यदान उपक्रम सुरु करण्यासाठी आपल्या  सहकार्याची गरज आहे. घनश्याम केळकर  दि. ११ सप्टेंबर रोजी नीरा येथे असणार आहेत. हा उपक्रम आपल्या गावात, जिल्ह्यात, तालुक्यात सुरू करण्यासाठी उत्साही, सामाजिक कामाची आवड असणाऱ्या लोकांची गरज आहे.
या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची माहिती घेण्यासाठी आणि यामध्ये सहभागी होण्यासाठी आपण त्यांना ९८८१०९८१३८ या संपर्क नंबरवर फोन करु शकता
 
To Top