निरा देवधर, काल भाटघर, आज सकाळी वीर तर आज सायंकाळी गुंजवणी धरण १०० टक्के भरले आहे.
आज दुपारी. ०४:०० वाजता गुंजवणी धरण १०० टक्के भरले असून धरण परिसरात पावसाचे प्रमाण व पाण्याची आवक वाढत असल्याने पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे.त्यामुळे नदी पाञामध्ये २०० cusec विद्युतगृहातून व ७९८ cusec सांडव्यातून विसर्ग चालू असून केव्हाही पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गात कमी अथवा जास्त बदल होऊ शकतो, याची नदीकाठच्या सर्वांनी नोंद घ्यावी. नदी पात्रात कोणीही जाऊ नये.
तरी सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा