बारामती l डोर्लेवाडीतील गवराईचा 'वर्क फ्रॉम होम' : जाधव कुटुंबाचा आकर्षक देखावा

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
डोर्लेवाडी : प्रतिनिधी 

कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून वर्क फ्रॉम होम चालू आहे. स्टडी टेबल ते डायनिंग टेबल साधने उपकरणांनी सजली आहे. जमेल तसे घरच्या घरी ऑफिस धाटत दोन वर्षांपासून वर्क फ्रॉम सुरू केले आहे. त्यानुसार डोर्लेवाडी (ता. बारामती) येथील जाधव परिवाराने चक्क गवराईना  'वर्क फ्रॉम होम' करण्यास भाग पाडले आहे. 

जाधव परिवार हा डोर्लेवाडी या ठिकाणी राहतात. गोरख जाधव हे दैनिक लोकमत डोर्लेवाडी या ठिकाणी वार्ताहर म्हणून काम पाहतात. मागील दीड वर्षांपासून सर्वच क्षेत्रात नोकरदार वर्क फ्रॉम होम करीत आहेत. यंदाचा गणेशोत्सवाला घरात काय सजावट करायची असा प्रश्न होता. 

परंतु वार्ताहर असलेल्या जाधव व त्यांचे मोठे बंधू संदीप प्रेमनाथ जाधव यांच्या  कुटुंबीयांनी सामाजिक संदेश देत जेष्ठ गौराईनाच अभ्यास करतानाचा निर्णय झाला. त्यानंतर त्यांनी कम्प्युटर, मोबाईल, टेबल, अशा विविध साहित्यांची जुळवाजुळव करून आधुनिक व मॉडर्न गौराई साकारण्यात आल्या. 

एक गौराईचे मोबाईल वरून कानाला हेडफोन लावून ऑनलाईन काम चालू आहे बाजूला ऑफिसचा लॅपटॉप, तिथेच एक पुस्तक डायरी आहे,लहान मुलांच्या अभ्यासाची पुस्तके असा अनोखा देखावा साकारण्यात आले आहे. तर दुसरी गौराई कम्प्युटरवर काम करताना दिसून येत आहे. त्यामुळे यानुसार गौराई वर्क फ्रॉम होमद्वारे संपूर्ण जगावर लक्ष ठेवण्याचे काम करणार असल्याचे वास्तविक चित्र दिसून येत आहे.
To Top