बारामती l डोर्लेवाडीच्या श्वेताली भिले यांनी गौरीच्या सजावटीतून पर्यावरण व कोरोना जनजागृतीचा संदेश : पहा व्हिडिओ

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------

डोर्लेवाडी परिसरात दरवर्षीच गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक गणेश उत्सवाला मर्यादा आल्या आहेत.मात्र घरोघरी गणेशाची स्थापना करून महिलांनी गौरीचा सण नियमांचे पालन करून साजरा केला आहे.डोर्लेवाडी येथील श्वेताली सोमनाथ भिले यांनी यावर्षी आपल्या घरी  पर्यावरण पूरक गणेशाची स्थापना केली

आहे.आकर्षक झाडांच्या कुंड्यांनी सजावट करून नैसर्गिक माती व रंग वापरून गणेशा ची मूर्ती तयार केली आहे.तसेच गेल्यावर्षी पासून संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आले आहे. कोरोना काळात रुग्णांना ऑक्सिजनची फार कमतरता जाणवली त्यामुळे यंदाची गौरी सजावट तिने  कोरोनाची थीम करून  वृक्षारोपणाचे महत्व देणारी केली आहे... गौरी सजावटीमध्ये पर्यावरण जागृतीचे अनेक संदेश दिले आहेत.त्यामुळे हळदी  कुंकवासाठी येणाऱ्या महिलांनी  तिच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
To Top