सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील शालेय विद्यार्थिनीसाठी आर.बी.सूर्यवंशी व बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यमिक विद्यालय गडदरवाडी खंडोबाचीवाडी या विद्यालयास विद्यालयातील विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र,सर्व सोई सुविधांनी युक्त व दर्जेदार स्वच्छतागृह बांधून देण्यात आले.
आर.बी.सूर्यवंशी सर व बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंटर यांच्यावतीने वारजे (पुणे ), कोयाळी (आळंदी), एकतपुर-मुंजवडी,पिंपरे खुर्द, जेऊर, वाल्हे जवळार्जुन (ता.पुरंदर) या ग्रामीण भागातील विद्यालयांना एकूण अकरा स्वच्छतागृहाची युनिट बांधून त्याचा हस्तांतरण सोहळा पार पडलेला आहे.आज त्याचा लाभ त्या त्या विद्यालयातील अधिकाधिक मुलींना होत असून भविष्यातही होत राहणार आहे. यातील काही स्वच्छता गृहाची बांधकामे आर बी सूर्यवंशी यांनी स्वखर्चातून केली आहेत.
काही बांधकामे बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंटर यांच्या वतीने बांधण्यात आलेली आहेत. माध्यमिक विद्यालय गडदरवाडी खंडोबाचीवाडी येथील हे बारावे युनिट तर बारामती तालुक्यातील पहिलेच युनिट आहे. ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थिनींच्या आरोग्याची गरज लक्षात घेऊन तसेच सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून BAI पुणे सेंटरचा हा उपक्रम अत्यंत उल्लेखनीय व कौतुकास्पद आहे.
माध्यमिक विद्यालय गडदरवाडी खंडोबाचीवाडी या विद्यालयात बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंटर व आर.बी.सूर्यवंशी सर यांच्या वतीने बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहाचा उद्घाटन समारंभ व हस्तांतरण सोहळा नुकताच संपन्न झाला.यावेळी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंटरचे माजी अध्यक्ष,आजीव सदस्य आर.बी.सूर्यवंशी तसेच अशोक अटकेकर (चेअरमन BAI पुणे सेंटर) शिवकुमार भल्ला (व्हाईस चेअरमन BAIपुणे) एच एस आनंद(सेक्रेटरी BAI पुणे) सुनील मते (खजिनदार BAI पुणे) हलबे एम.जे,प्रदिप गाडगे, सुभाष देशपांडे, सी एस परिहार, मनोज देशमुख (सर्व माजी अध्यक्ष BAI पुणे)तसेच सी.एच. रतलानी, डी एस चौधरी, रमेश लाल(सदस्य BAI पुणे) किल्लेदार पाटील (सहा.संयोजक स्वच्छतागृह बांधकाम) खराडे, संभाजी ठोंबरे कॉन्ट्रॅक्टर हे सर्वजण उपस्थित होते.तसेच खंडोबाचीवाडी गावचे सरपंच भाग्यश्री गडदरे,ग्रामसेविका सीमा गावडे ग्रा.पं. सदस्य नवनाथ गडदरे, दादा वाघापुरे,विद्यालयाचे मुख्याध्यापक,सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी व काही विद्यार्थीनी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात . कुसेकर यांनी विद्यालयाविषयी आणि आर.बी.सूर्यवंशी आणि BAI पुणे सेंटर या संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली.शाळेचे मुख्याध्यापक .मोहन कोकरे यांनी प्रमुख पाहुण्यांचे व सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत व सत्कार केला तर .आकांक्षा गायकवाड या विद्यार्थिनी प्रतिनिधीने स्वच्छतागृहांअभावी निर्माण होणाऱ्या समस्या व स्वच्छता गृहाचे महत्व याविषयी आपले मनोगत व्यक्त केले . आर बी सूर्यवंशी यांनी स्वच्छतागृहांअभावी ग्रामीण विद्यार्थिनींना येणाऱ्या समस्या, त्याचा आरोग्यावर आणि शिक्षणावर होणारा परिणाम याविषयी मार्गदर्शन केले.तसेच विद्यालयाच्या विकास कामासाठी एक लाख रुपयांची देणगी देण्याचे जाहीर केले .तसेच BAI पुणे सेंटरचे चे अध्यक्ष अटकेकर सर, भल्ला (उपाध्यक्ष )व संस्थेचे खजिनदार सुनील मते यांनी विद्यालयातील सर्व वर्गखोल्यांमध्ये लाईट फिटिंग व फॅन बसवून देण्याचे आश्वासन दिले.आपल्या अध्यक्षीय भाषणात अटकेकर यांनी स्वच्छतागृहाची स्वच्छता कशी राखली जावी या विषयी आपले मत व्यक्त केले. विद्यालयाचे कलाशिक्षक धनंजय गायकवाड यांच्याकडून विद्यालया मार्फत BAI पुणे सेंटर यांना निसर्गचित्राचे पेंटिंग भेट म्हणून देण्यात आले.कार्यक्रमाचे आभार अमोल गायकवाड यांनी मानले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव पिसाळ यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक, सर्व शिक्षक- शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी उत्कृष्ट रित्या पार पाडले