राज्यातील सर्वच सहकारी संस्थांच्या सर्वसाधारण सभांना 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ : राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------

 राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत बुधवारी घेण्यात आला. त्यासाठी अध्यादेश काढण्यात येणार आहे.
       वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास मुदतवाढ दिल्यामुळे संस्थेमधील काही महत्त्वाच्या विषयांना मंजुरी देण्याबाबत विलंब लागू शकतो. त्यासाठी, संस्थेमधील शिल्लक रकमेच्या विनियोगाचे अधिकार, पुढील वर्षाच्या आर्थिक पत्रकास मंजुरी देणे व लेखा परीक्षकाची नेमणूक करणे, आदी महत्त्वाच्या विषयांबाबत २०२१-२२ साठी वार्षिक सर्वसाधारण सभेने मंजूर करण्याऐवजी मंजुरीचे अधिकार संचालक मंडळास देण्यात आले.
To Top