सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सासवड : प्रतिनिधी
सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊसाचे क्षेत्र वाढले असताना सर्वांचे गाळप करणे गरजेचे होते. मात्र मागील पाच वर्षात कारखान्याने सभासदांचा तब्बल १० लाख टन उसा शेजारच्या खाजगी कारखान्यांना दिला व यातूनच ५० कोटी रुपये सभासदांचे सत्ताधाऱ्यांनी लुटले असल्याचा आरोप करत कारखान्याने ३१०० रुपयाचा भाव दिल्याचे मोठ्या दिमाखात सांगितले. परंतु उरलेल्या ३०० रुपयांमधील अवघे ९२ रुपये सभासदांच्या हाती पडणार असल्याचे सोमेश्वर परिवर्तन पॅनलचे प्रमुख दिलीप खैरे यांनी सांगितले.
सासवड ( ता. पुरंदर ) येथे पुरंदर तालुका भाजपच्या वतीने सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकी संदर्भात उमेदवार व पक्षाचे पदाधिकारी यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने गेल्यावर्षी शेतकऱ्यांचा ऊस खाजगी कारखान्यांना देऊन शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान केले आहे. अशा पद्दतीने सत्ताधारी हे शेतकरी व कारखान्याचे दिवाळे काढुन सर्व कारखाने मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. ज्याप्रमाणे जरंडेश्वर हा साखर कारखाना बारामतीकरांनी लिलावात काढला. त्याच प्रमाणे सोमेश्वर सहकारी साखर कारखाना देखील भविष्यात लिलावात काढतील असे बोलत भाजपाचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी सत्ताधारी यांचे वाभाडे काढले.
नरेंद्र मोदी यांनी एफ.आर.पीचा कायदा आणल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे. हे आपल्या लोकांनी शेतकऱ्यांना सांगितले पाहिजे असे गणेश भेगडे यांनी सांगितले.
यावेळी भाजपाचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हा सरचिटणीस अँड. धर्मेंद्र खांडरे, उपाध्यक्ष राहुल शेवाळे, प्रचार प्रमुख दिलीप खैरे, सचिन लंबाते, प्रकाश जगताप, शेखर वढणे, श्रीकांत ताम्हाणे, अलका शिंदे, साकेत जगताप, विठ्ठल जगताप, हनुमंत साळुंखे, सचिन पेशवे, निलेश जगदाळे, योगेश जगदाळे, गोविंद भोसले, सोमनाथ राणे, शैलेश तांदळे, सुरेंद्र देशमुख आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे जिल्हा युवा मोर्चाचे सरचिटणीस युवराज तावरे यांनी केले. सूत्रसंचालन श्रीकांत थेटे यांनी केले. तर आभार कैलास जगताप यांनी मानले.