सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोसरी : प्रतिनिधी
पुणे येथील सुप्रसिद्ध रांगोळी कलाकार राजश्री नितीन भागवत( जुन्नरकर) यांना राज्यस्तरीय आर्ट बिट्स संस्थेकडून युवा कला गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
रांगोळी क्षेत्रात काम करत असताना महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेर रांगोळी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी तसेच अनेक विश्व रेकॉर्ड आपल्या नावावर केलेले आहेत, याची दखल घेऊन पुणे येथील आर्ट बिट्स संस्थेमार्फत राज्यस्तरीय कला गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आर्ट बिट्स संस्था गेली 20 वर्ष चित्र, शिल्प, संगीत, अभिनय, नृत्य आणि लोककला अशा विविध विभागातील कलाकारांना सक्षम व्यासपीठ देण्याचे,विविध क्षेत्रातील कलाकार जगासमोर आणण्याचा प्रयत्न करत असते.