बारा टक्के पगारवाढ : 'सोमेश्वर' च्या कामगारांचे पेढे भरवून फटाके वाजवून आनंदोत्सव

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------

 श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर साखर कामगारांना १२ टक्के वेतनवाढ मिळाल्याबद्दल तसेच सोमेश्वर कारखान्याने संपुर्ण पुणे जिल्ह्यात विक्रमी प्रति मे.टन ३१०० रुपये ऊसदर दिल्याबद्दल पेढे वाटुन व फटाके वाजवित कामगारांनी आनंदोत्सव साजरा केला. 
         यावेळी देशाचे माजी केंद्रीय कृषीमंत्री आदरणीय शरद पवार, महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे तसेच त्रिपक्षीय कमिटीचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप, व्हा.चेअरमन शैलेश रासकर, कार्यकारी संचालक आर.एन.यादव यांचे सर्व कामगार प्रतिनिधी व कामगारांनी जाहीर आभार व्यक्त केले. यावेळी माजी कामगार संचालक .बाळासाहेब गायकवाड, माजी कामगार संचालक .बाळासाहेब काकडे, तानाजी सोरटे, हनुमंत भापकर, पंढरीनाथ राऊत, कैलास जगताप, संतोष भोसले, कारखान्याचे अधिकारी व सर्व कामगार बंधु उपस्थित होते.
To Top