सुनील : जाधव
प्रतिनिधी : सोमेश्वर रिपोर्टर टीम------
पणदारे - सगोबाची वाडी येथील सौ.सारिका रोहित राजमाने या फौजी च्या पत्नीने रेखाटला सामाजिक बांधिलकीचा गौरी गणपतीचा देखावा. काल घरोघरी गौराई विराजमान झाले आहेत. भक्तांनी विविध प्रकारे सामाजिक बांधिलकी जपून विविध संदेश देण्याचा देखावे निर्माण केले आहेत. त्यातीलच हा एक सामाजिक संदेश देणारा गौरी चा देखावा घेतोय सर्वांचे लक्ष वेधून. अनेकांनी गौरी गणपतीचे देखावे बनवले आहेत सर्व देखावे सामाजिक संदेश देणार आहेत मात्र हा राजमाने कुटुंबांनी वेगवेगळ्या प्रकारे देखाव्यामधून संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये कोविंड 19 जनजागृती करण्यासाठी सर्वांनी लस घ्यावी, सॅनिटायझरचा वापर करावा, मास्क वापरावे, सोशल डिस्टन्स वापर करावा, काळजी घ्यावी असे संदेश दिला आहे. सद्यपरिस्थिती कोविड 19 संकट, नैसर्गिक संकट यामुळे हवालदिल झालेला शेतकरी, या शेतकऱ्यांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शेतमालाला नसलेला बाजार भाव , शेतकऱ्यांचे होणारे नुकसान सर्वसामान्य जनतेचे हाल या देखाव्यांमध्ये संदेशात देण्यात आलेले आहेत. यावेळी सौ सारिका रोहित राजमाने यांचे पती देश सेवेत फौजी (CRPF) म्हणून कार्यरत आहेत. यावेळी देशासाठी ऑलम्पिक मध्ये मिळालेले पदक याची ही रचनात्मक कृती केली आहे.हे सर्व करत असताना त्यांच्या सासू मालन व सासरे दिलीप व मुले शंभू, रियांश यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. परिसरातील देखावा पाहणारे,यांचेही कौतुकाचा वर्षाव होऊ लागला आहे.