सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील ऋतुजा चेतन गायकवाड व गोपिका मोहन गायकवाड यांनी गौरीचा बनवलेला देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
काल घरोघरी गौराई विराजमान झाल्या. आज गौरी पूजन.. अनेकांनी गणपती व गौरीचे विविध देखावे बनवले आहेत. सर्वच देखावे उत्तम सामाजिक संदेश देणारे आहेत मात्र त्यात चेतन गायकवाड यांनी बनवलेला गौरीचा देखावा हा कोविड १९ काळात आपण कोणती काळजी व कोविड लसीकरण वर सामाजिक संदेश देणारा देखावा साकारला आहे.