सोमेश्वर रिपोर्टर टीम------
काल भाटघर धरण १०० टक्के भरल्या नंतर आज सकाळी वीर ९५.६८ टक्के भरल्याने नीरा नदीत कोणत्याही क्षणी पाणी सोडले जाणार असल्याने नीरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
आज सकाळी ९.०० वाजता वीर धरण ९५.६८ टक्के भरले असून धरण परिसरात पावसाचे प्रमाण व पाण्याची आवक वाढत असल्याने पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे.त्यामुळे नीरा नदी पाञा मध्ये आज दुपारी १२.०० वा. नंतर केव्हाही पाणी सोडण्यात येईल याची नदीकाठच्या सर्वांनी नोंद घ्यावी.निरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये.