सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाकी,चोपडज, मगरवाडी, गडदरवाडी आणि सोरटेवाडी येथे बिबट्याने दर्शन दिल्यानंतर दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर काल मुरूम येथील भंडलकरवस्ती येथे तर आज सायंकाळी निंबुत येथील जगताप वस्ती येथे बिबट्याने पुन्हा दर्शन दिल्याने घबराटीचे वातावरण तयार झाले आहे.
दरम्यान आज वनरक्षक कोकाटे व त्यांच्या टीम ने पाहणी केली असता बिबट्याचेच ते ठशे आहेत याला त्यांनी दुजोरा दिला आहे. सविस्तर हकीकत अशी काल दि १५ रात्री तानाजी भंडलकर हे आपल्या दुचाकीवरून घरी निघाले असता उसातून बाहेर आलेल्या बिबट्याने त्यांना दर्शन दिले. तर निंबुत येथे आज सायंकाळी ७ वाजता जगतापवस्ती येथे नीरा डाव्या कालव्यावर बिबट्याने दर्शन दिले.