सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
मोरगाव : जिल्हा परीषद पुणे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ , सुंदर व कचरामुक्त पुणे जिल्हा कार्यक्रमाचे आज आयोजन केले होते . या अंतर्गत बारामती तालुक्यातील ग्रामपंचायती मार्फत महास्वच्छता व महा श्रमदान करण्यात आले . मोरगाव , तरडोली सह परीसरातील गावांत रस्ते व परीसराची स्वच्छता करण्यात आली यामध्ये गावचे सरपंचांसहीत ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता
आज पुणे जिल्हा परीषदे मार्फत प्रत्येक गावमध्ये महास्वच्छता व महाश्रमदान कार्यक्रमाचे आयोजन केले होते . हा कार्यक्रम मोरगाव , तरडोली , आंबी , लोणी भापकर , मासळवाडी , मुर्टी आदी गावात संपन्न झाला . मोरगाव येथे ग्रामपंचायत पार्कींग , रस्ते , सार्वजनिक स्वच्छतागृह परीसर आदी ठिकाणी स्वच्छता करण्यात आली . यावेळी सरपंच निलेश केदारी , ग्रामसेवक मोरेश्वर गाडे , ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते .

तर तरडोली येथे प्राथमिक शाळा , अंगणवाडी , ग्रामपंचायत कार्यालय परीसर स्वच्छ केला. यावेळी सरपंच नवनाथ जगदाळे , उपसरपंच महेंद्र तांबे , ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ , प्राथमिक शाळा शिक्षक उपस्थित होते . या महास्वच्छता कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या ग्रामस्थांचे सरपंच केदारी यांनी आभार मानले .