तीन टप्यात एफआरपीला विरोध : 'सोमेश्वर' च्या शेतकऱ्यांचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------

उसाची एफआरपी एकरकमी देणे संबंधी कायदा अस्तित्वात असताना केंद्र व राज्य सरकार बेकायदेशीररीत्या एफआरपी तीन देण्याच्या निर्णयास मंजुरी दिली आहे. सदर निर्णयास आमचा विरोध आहे. असे निवेदन सोमेश्वर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना दिले आहे. 
           या शेतकऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र भासन व राज्य शासन यांनी उसाची किंमत एफआरची एकरकमी देणे संबंधी कायदा अस्तित्वात असताना बेकायदेशीररीत्या एफआरपी तीन टप्प्यात देण्याच्या निर्णयास मंजुरी दिली आहे. सदर निर्णयास आमचा विरोध असून शासनाचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत जर कारखान्याने  एफआरपी तीन टप्प्यात दिली तर शेतकरी मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी होऊन आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढेल व त्यास सर्वस्वी शासन जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले आहे. 
To Top