सोमेश्वर रिपोर्टर टीम------
जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य असोसिएशन महाराष्ट्रच्या बारामती तालुका अध्यक्षतेपदी लक्ष्मण गोफणे यांची निवड करण्यात आली आहे.
पुणे जिल्हा परिषद पुणे याठिकाणी नुकताच हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य असोसिएशन महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष कैलास गोरे पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष उदय बने, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष शरद बुट्टे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतारे, आरोग्य व बांधकाम सभापती प्रमोद काकडे, माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, वैशाली आबने, देवराम लांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
लक्ष्मण गोफणे हे बारामती तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती होते तसेच ते सद्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक आहेत.