बारामती तालुक्यात जिल्ह्यात 'रेकॉर्डब्रेक' रक्तदान : पोलिसांनी भरवलेल्या शिबिरातून तब्बल २९३७ बाटल्या रक्तसंकलन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------

देशात व राज्यात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीणचे डॉ. अभिनव देशमुखसाहेब यांच्या संकल्पनेतून, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहितेसाहेब तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकरसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व गणेश मंडळ, पत्रकार बांधव, ग्रामपंचायत, सामाजिक सेवाभावी संस्था, पोलीस पाटील तसेच नागरिकांच्या मदतीने भव्य रक्तदान शिबिर वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन यांच्या वतीने व अक्षय ब्लड बँक पुणे यांचे सहकार्याने बुधवार दि. २२ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरात एकूण १३१७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर बारामती शहरात दि १५ रोजी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात १६२० बाटल्या रक्त संकलन करण्यात आले. 
         अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहितेसाहेब, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकरसाहेब, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी अनिल बागल, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.
      वडगाव निं.पोलीस स्टेशन हद्दीत वडगाव निंबाळकर येथे (३६२), करंजेपुल दुरक्षेत्र (२८३), सुपा दुरक्षेत्र (२६०), पणदरे दुरक्षेत्र (२५८) व मोरगाव पोलीस मदत केंद्र (१५४) अशा ५ ठिकाणी एकूण १३१७ रक्तपिशवी संकलन झाले.   
    संपूर्ण पुणे जिल्ह्यात १४४५ पिशवी रक्त संकलन झालेले असून याव्यतिरिक्त फक्त वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आयोजित रक्तदान शिबिरात १३१७ रक्तपिशवी संकलन झाले. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनकडील ३ पोलीस अधिकारी व २५ पोलीस अंमलदार यांनी सुद्धा रक्तदान करून सक्रिय असा उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार श्री.चिंतामणी क्षीरसागर यांनी तर आभार पोलीस उपनिरीक्षक श्री.गणेश कवीतके यांनी मानले.
To Top