सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
डोर्लेवाडी : प्रतिनिधी
डोर्लेवाडी हे गाव नेहमी चांगले काम करणाऱ्यांचा नेहमी सन्मान करत असते .समाजिक कामे करता असताना आपापसातील राजकीय मतभेत विसरून एकत्र येण्याचा या गावाचा आदर्श प्रेरणादायी आहे त्यामुळे या गावाचा नावलौकिक सर्वदुर पसरला आहे. असे प्रतिपादन बारामती ऍग्रोचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी केले.
डोर्लेवाडी (ता.बारामती ) राज्य उत्पादन शुल्क पुणे जिल्हा अधीक्षक संतोष झगडे, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, आयर्नमॅन दशरथ जाधव, बारामती शहर पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ग्रामस्थांच्या वतीने कोरोनाचे सर्व नियम पाळून गायत्री लॉन्स येथे नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी पवार बोलत होते.
यावेळी बारामती पंचायत समितीचे माजी सभापती अशोक नवले छत्रपती साखर कारखाना माजी संचालक रमेश मोरे,पंचायत समिती सदस्य राहुल झारगड,सरपंच पांडुरंग सरवदे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय काळोखे,रामभाऊ बनकर,संदीप नाळे,खरेदी विक्री संघ संचालक भगवान क्षीरसागर, छत्रपती कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे, सामाजिक कार्यकर्ते संतोष नेवसे, कांतीलाल नाळे,कृष्णात जाधव झारगडवाडीचे सरपंच नितीन शेडगे, कांतीलाल काळकुटे,भीमराव मदने,आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
सध्या महारष्ट्रा शासानाच्या नियमाप्रमाणे ताडी दुकानाचे निलाव निघालेले आहे.परंतु यावेळी अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क पुणे जिल्हा संतोष झगडे म्हणाले की उद्या कोणीही ताडी दुकान सुरु केले व त्यामध्ये केमिकल आढळून आल्यास त्या दुकानदाराचे कायमचे दुकान बंद करून त्याच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात येईल. संतोष झगडे- अधीक्षक ,राज्य उत्पादन शुल्क पुणे जिल्हा
त्यामुळे केमिकल युक्त ताडी विकणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
डोर्लेवाडी ही माझी जन्म भूमी व क्रीडा क्षेत्रात नावजलेले गाव आहे.इथेच मला खेळाचा वारसा मिळाला व मी खेळामध्ये चांगलेच यश संपादन करू शकलो आहे.सलग मला ४ वेळा आयर्नमॅन पुरस्कार ६४ व्या वर्षी मिळाला आहे. आयर्नमॅन दशरथराव जाधव बारामतीत आल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रोत्साहान दिल्यामुळे बारामती व परिसरातील अवैध व्यवसाय व खाजगी सावकारी बंद करून नागरिकांना भयमुक्त करण्यात मला यश आले.- उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर