पोलिसांची हाक आणि युवकांची साथ : वडगाव निंबाळकर पोलिसांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात तब्बल १३१७ बाटल्या रक्त संकलन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----

ऱक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे ते आत्ताच्या परिस्थीतीत खुप गरजेचे आहे, तुमच्यामुळे एखाद्याचा जीव वाचु शकतो या भावनेने मिळालेले  समाधान सर्वात मोठे आहे त्यातुन तुम्ही निभावलेले  माणूसपणाचे नाते दिसुन येते असे मत बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते यानी व्यक्त केले .
            कोव्हीड सारख्या भयंकर संकटात रक्ताची कमतरता भासत  असल्याने पुणे जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख यांच्या सुचनेनुसार बारामती तालुक्यातील विविध ठिकाणी आज रक्तदानाचा कार्यक्रम आयोजीत केला होता. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन अंकीत  करंजेपुल पोलीस चौकीसमोर  रक्तदान शिबीर उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. बारामती चे पोलीस उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर , पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे ,वडगाव चे स पो नि सोमनाथ लांडे ,पोलीस उपनिरिक्षक योगेश शेलार यांचेसह सर्व पोलीस स्टाफ व परिसरातील पदाधिकारी व युवक कार्यकर्ते हजर होते .
         प्रास्ताविकामधे वडगाव निंबाळकर चे स पो नि सोमनाथ लांडे यानी सोमेश्वर परिसरातील अनेक सामाजीक संघटनाचे कौतुक करीत सतत वेगवेगळे सामाजीक उपक्रम राबविणारे नागरीक असल्याने आपल्याला असे कार्य करताना कोणतीही अडचण होत नाही व करंजेपुल चौकी अंतर्गत जास्तीत जास्त रक्तदाते उपलब्ध झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानले .
            डी वाय एस पी नारायण शिरगावकर यानी सोमेश्वरनगर परिसरात सामाजीक कार्य मोठ्या प्रमाणावर होते असे सांगुन सर्व नागरीकांचे कौतुक केले पोलीस निरिक्षक नामदेव शिंदे यानी रक्तदात्याचे आभार मानले .
  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड. गणेश आळंदीकर यानी केले. आभार पोलीस उपनिरिक्षक योगेश शेलार यानी मानले .
     अक्षय ब्लड बॅंक हडपसर चे डॉ सुजीत शिंदे ,रुपेश दरेकर ,अविनाश जोशी ,शुभ गवळी ,चंद्रसेन कळके ,विकास पाटील ,विजय भोसले ई. नी रक्तगट तपासणी व ईतर तपासण्या केल्या. सोमेश्वर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप ,उपाध्यक्ष शैलेश रासकर ,राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर ,सतीश सकुंडे ,सभापती नीता फरांदे राजवर्धन शिंदे ,अभिजीत काकडे, किरण आळंदीकर ,कौस्तुभ चव्हाण,ॲड. नवनाथ भोसले , बुवासाहेब हुंबरे ,धनंजय गडदरे , पोलीस पाटील चौधरी ,प्रदीप कणसे ,ऋषी गायकवाड,आजी माजी सैनिक संघ चे बाळासाहेब शेंडकर ,राजाराम शेंडकर ,नितीन शेंडकर करंजे कार्यकर्ते संतोष गायकवाड,सुचेता साळवे ,नुसरत ईनामदार ,पत्रकार संतोष शेंडकर महेश जगताप युवराज खोमणे दत्ता माळशिकारे तुषार धुमाळ महंमद शेख उपस्थीत होते .
To Top