सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
कल्याणी जगताप
बारामती तालुक्यातील समर्थ फिल्म प्रोडक्शन व प्रेमवारी प्रोडक्शन यांनी निर्मिती केलेला बालमित्र हा मराठी वेब - सिनेमा नुकताच MX प्लेयर या नामांकित ओटीटी प्लॅटफॉर्मला रिलीज झाला आहे , अशा प्रकारे ओटीटीवर रिलीज होणारा बारामतीतील हा पहिलाच चित्रपट आहे ,
बालमित्र मध्ये लहान असताना केलेली मैत्री किती निखळ असते व मैत्रीची काय किंमत असते असा कथासार आहे , त्याच प्रमाणे ग्रामीण भागातील शेतकरी बांधवाना येणाऱ्या लहान लहान अडचणी ही मांडण्यात आल्या आहेत ,
बालमित्र या चित्रपटाचे दिग्दर्शन व निर्मिती किरण गाजरे यांची असून भिमराज गायकवाड यांनी लिखाण केले आहे , तर छायांकन व संकलन किरण पवार यांनी केलं आहे
यामध्ये राजदत्त पाटणकर , साक्षी परकाळे , किसन मोरे ,अंकुश सवल्लख , किरण गाजरे यांच्या मुख्य भूमिका आहेत.
तसेच रोहित व्हावळ यांनी निर्मिती व्यवस्थापन पाहिलं आहे , चित्रपटाचं शूटिंग हे वडगाव , माळेगाव , होळ या ठिकाणी झाले आहे किरण गाजरे यांनी यापूर्वीही तुरा हा वेब - सिनेमा केला होता , तुरा तब्बल पाच लाख लोकांनी पाहिला आहे , याच संस्थेची निर्मिती असणारी सुंदरी व शेवटचं पान ह्या वेब सिरीज ला देखील प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता ,