पुरंदर l परिंचेत ई पीक पाहणी कार्यशाळा संपन्न : शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन ई पीक पाहणीचे प्रात्यक्षिक

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------

परींचे (वार्ताहार) : शेतकर्‍यांना शेतातील पिकांची नोंद सातबारावर स्वत: करून घेता यावी, यासाठी शासनाने ई पीक पाहणी अँप सुरू केले आहे. या अँपमध्ये शेतकर्‍यांनी मोबाईलच्या माध्यमातून स्वत:च्या शेतातील पिकाची नोंद कशी करावी याचे प्रात्यक्षिक परिंचे येथे घेण्यात आले. प्रायोगिक स्तरावर सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक यांनी थेट बांधावर जाऊन शेतकर्‍यांना प्रात्यक्षिक करून दाखवले. शेतकर्‍यांशी थेट संवाद साधला गेल्याने शेतकरी यांना येणाऱ्या अडचणींचे तात्काळ निराकरण झाले.
           परिंचे येथे पोपट नानगुडे यांच्या शेतातील पिकाची नोंद ई पीक पाहणी अँपमध्ये नोंद तलाठी सुमित मंडलेचा यांनी करून दाखवली. शेतात टोमॅटो, ऊस आणि ज्वारी, झेंडू, कांदा या पिकाची नोंद घेण्यासोबतच त्यांच्या शेतातील सिंचन सुविधेची सुद्धा नोंद अँपमध्ये करण्यात येत आहे.एका मोबाईलवरून २0 शेतकर्‍यांच्या पिकांची नोंद घेता येते. त्यामुळे अँड्रॉइड मोबाईल असलेल्या तरुण शेतकर्‍यांनी त्यांच्या मोबाईलवरून इतर शेतकर्‍यांच्या पिकाची नोंद करून देण्यासाठी पुढाकार घेण्यासोबतच तलाठी, कृषी सहाय्यक, पोलीस पाटील यांनी शेतकर्‍यांना पीक नोंद करण्यासाठी सहकार्य करण्याच्या सूचना सरपंच ऋतुजा जाधव यांनी दिल्या. 
            या प्रसंगी सरपंच ऋतुजा जाधव, उपसरपंच दत्तात्रय राऊत, ग्रामपंचायत  सदस्य वंदना राऊत, प्रवीण जाधव, गणेश पारखी, अजित नवले, तलाठी सुमित मंडलेचा, कृषी सहायक संदेश समगीर, ग्रामसेवक शशांक सावंत,  उल्हासनाना जाधव, नंदकुमार जाधव संभाजी नवले, गुणशेखर जाधव, बाबसाहेब जाधव, शिवाजी जाधव, संजय जाधव, संतोष शेडगे, डी सी जाधव, संतोष नानगुडे, जयवंत जाधव,चंद्रकांत खोपडे,प्रदीप जाधव, दत्तात्रय चौधरी, अक्षय जाधव, रमेश कदम, यांच्यासह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.


To Top