सातारा ! डिजिटल मीडियाच्या जिल्हा अध्यक्षपदी सचिन भिलारे तर सचिवपदी प्रशांत ढावरे यांची निवड

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना हि महाराष्ट्र राज्याची डिजिटल मिडियामध्ये कार्यरत असलेल्या पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी राज्य पातळीवर कार्यरत असणारी संघटना आहे. या संघटनेची राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र जिल्हा कार्यकारिणी नेमण्यात आलेली आहे. डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेची सातारा जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात आलेली आहे व यानुसार सातारा जिल्हा अध्यक्षपदी भिलार ता. महाबळेश्वर येथील सचिन भिलारे, उपाध्यक्षपदी देऊर ता. कोरेगाव येथील प्रकाश कुंभार, सचिवपदी पाडेगाव ता. फलटण येथील प्रशांत ढावरे व प्रसिद्धीप्रमुखपदी देगाव ता. वाई येथील अशोक इथापे यांची निवड करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून या कार्यकारिणीवर सदस्य नेमणुका करण्यात आल्या असून कराड तालुक्यातून कैलाश थोरावडे, जावली तालुक्यातून संतोष शिराळे, सातारा तालुक्यातून निलेश भिलारे, जावली तालुक्यातून मेढा येथील सोमनाथ साखरे, वाई तालुक्यातून कवठे येथील विनोद पोळ, कराड तालुक्यातून नितीन ढापरे, लोणंद तालुक्यातून राहील सय्यद, माण तालुक्यातून गोंदवले येथील संदीप जठार यांची निवड करण्यात आलेली आहे.
डिजिटल मिडिया क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व घटकांचे हित जोपासण्यासाठी आणि या माध्यमाला सामाजिक मूल्य तसेच सामाजिक जबाबदारीच्या चौकटीत कार्यरत करण्यासाठी सदैव कार्यशील राखण्यासाठी  संघटनेच्या ध्येयधोरणाला अनुसरून या निवडी झाल्याबद्दल सातारा जिल्ह्यातील प्रिंट मिडिया व इलेक्ट्राँनिक मिडीयाच्या माध्यम प्रतिनिधींनी सातारा जिल्हा कार्यकारिणीचे अभिनंदन केले आहे.
To Top