हृदयद्रावक ! रेल्वेच्या धडकेत पिता पुत्र ठार :खंडाळा तालुक्यातील लोणंद रेल्वे स्टेशन जवळ घडलेली घटना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
लोणंद प्रतिनिधी 

लोणंद रेल्वे स्टेशन नजीक निरा बाजुला काल रविवारी दिनांक २६ रोजी सांयकाळी बेंगलोर - जोधपूर एक्सप्रेस रेल्वे गाडी नंबर ०६५०६ या रेल्वेच्या धडकेमध्ये अंदोरी ता खंडाळा येथील एस आर पी मध्ये कार्यरत असलेले  शैलेश ज्ञानेश्वर बोडके वय २८ वर्षीय  व त्यांचा एक वर्षाच्या मुलाचा कु.रुद्र बोडके यांचा दुर्देवी मृत्यु झाला आहे. 

या अंदोरी  ता खंडाळा शैलेश बोडके हे धुळे येथे एसआरपीएफ मध्ये कार्यरत आहे.तर त्यांची पत्नी मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहे. शैलेश बोडके हे सुट्टी घेऊन दोन दिवसापुर्वीच अंदोरी येथे घरी आला होता. शैलेश बोडके हे त्यांच्या रुद्र बोडके या एक वर्षाच्या मुलासह रविवारी सांयकाळी लोणंद रेल्वे स्टेशनवर गेला असता बेंगलोर - जोधपूर एक्सप्रेस या रेल्वेच्या धडकेमध्ये शैलेश बोडके व  रुद्र बोडके या पिता - पुत्राचा दुर्देवी मृत्यु झाला आहे. या घटनेनंतर रेल्वे सपोनि व्ही आर पाटोळे , आदीनाथ भोसले व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले होते.
To Top