संतापजनक ! वाई : सुरूरच्या स्मशानभूमीत मांत्रिकाची एका अल्पवयीन मुलीवर अघोरी पूजा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी

सुरूर ता. वाई हे गाव धावजी पाटील या मंदिरामुळे राज्यात प्रसिद्ध आहे. मांढरदेवीची काळूबाईला भेटायला येणारे भक्त दावजी पाटील मंदिराला नेहमीच भेट देत असतात. या मंदिरातसुद्धा काही तांत्रिक मांत्रिक गोष्टी घडत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आल्याने येथील पूजा-यांवर कारवाई करण्यात आली होती. व तेंव्हापासून या मंदिर परिसरातील बाहेरून येणा-या पूजा-यांचे तंत्रमंत्र प्रकार पोलीस हस्तक्षेपाने बंद झाले होते. सुरूर ता. वाई येथील स्मशानभूमी या मंदिरापासून काही अंतरावरच आहे. या स्मशानभूमीत मात्र अघोरी प्रकार घडल्याने सुरुरकर ग्रामस्थांच्या काळजाचा ठोका चुकला. या स्मशानभूमीत एका लाल शर्ट घातलेल्या तंत्रीकाने एका अल्पवयीन युवतीवर बाहेरचे लागीर झाले आहे .असे सांगितल्याने स्मशानभूमीत हळदीकुंकवाचे गोलाकार रिंगण आखून  त्याशेजारी अंडे, नारळ, लिंबू, काळी बाहुली ठेवून अल्पवयीन मुलीस केस मोकळे सोडून बसविल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्याने. ग्रामस्थांनी याबाबत या मुलीसोबत आलेल्या स्त्रियांना व पुरुषांना हटकले असता आमच्या मुलीस बाहेरची बाधा झाली असून ती काढण्यासाठी व कोंबडा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत .असे यावेळी सांगण्यात आल्याने व या  मुलीसोबत असलेल्या महिलांनी गोंधळ करावयाला सुरुवात केल्याने सुरूर ग्रामस्थामध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र या ठिकाणी ग्रामस्थ बहुसंख्येने जमा झाल्यावर आम्ही पुण्याहून आलो आहोत एवढीच जुजबी माहिती देऊन या लोकांनी स्मशानभूमीतून पळ काढला.दरम्यान गेल्या कित्येक वर्षापासून सुरूर येथील मंदिर परिसरात सुरु असलेले अंधश्रद्धेचे प्रकार बंद पाडण्यात स्थानिक प्रशासनाला यश आले होते. मात्र दावजी पाटील मंदिर परिसरात पुन्हा हळूहळू चोरी छुप्या मार्गाने बाहेरील मांत्रिक व पुजारी असे प्रकार करीत होते मात्र आता उघडच स्मशानभूमीत हा प्रकार घडल्याने स्थानिक प्रशासनाने यात लक्ष घालून हे प्रकरण तडीस नेण्याची गरज आहे त्याचबरोबर दावजी पाटील मंदिर परिसरावरसुद्धा प्रशासनाचे लक्ष ठेवून कडक कारवाई केल्यास येथे येणा-या भक्तांची अंधश्रद्धेपायी होणारी लुट बंद झालीच पाहिजे असे स्थानिक नागरिकांचे मत आहे.

To Top