सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजप प्रणित सोमेश्वर परिवर्तन पॅनलचे उमेदवार जाहीर झाले असल्याची माहिती पॅनेल प्रमुख दिलीप खैरे यांनी दिली.
खैरे म्हणाले सोमेश्वर कारखाना निवडणुकीत भाजपच्या वतीने ३५ इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामध्ये आम्ही पाच गटांमधून भक्कम उमेदवार उभे केले आहेत. सद्या सोमेश्वर परिवर्तन पॅनेलचे गावोगावी संपर्क दौरे सुरू असून वयक्तिक गाठीभेटींवर भर देण्यात आला आहे. दरम्यान निवडण्यात आलेल्या २१ उमेदवारांना पक्षाने कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. आज दुपारपर्यंत अधिकृत उमेदवार यादी जाहीर करण्यात येईल अशी माहिती दिलीप खैरे यांनी दिली.